Share

गंभीर! ‘मराठा आरक्षणाच्या अहवालातील चार हजार पाने गायब’, भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून मुकावं लागल्याचा दावा भाजपकडून होतोय. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या आरोपामुळे राज्यात खळबळ उडालीये. मराठा आरक्षणा संदर्भातील मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल चार हजार पाने गायब असल्याचा दावा लोणीकरांनी केलाय.

भाजप नेते लोणीकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. त्यांनी मराठा आरक्षण संदर्भातील मागास वर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल ४ हजार पाने गायब असल्याचा आरोप केलाय. तसेच गायब झालेले चार हजार पाने ही सुप्रीम कोर्टात दाखल झाली नसल्याचेही सांगितले आहे. मराठा समाजाचा कोणी विश्वास घात केला? असा प्रश्न त्यांनी यानिमित्त उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणीसुद्धा लोणीकर यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. तरीही महाराष्ट्रातील जवळपास २१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही, असे नमूद करत त्यांना तातडीने नियुक्ती पत्र देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!