नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात पहिल्यांदाच आकडेवारीने चांगले संकेत दिलेत. देशात प्रथमच एका दिवसात ३ लाख ८५ हजार ४३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याआधी शुक्रवारी ३ लाख २७ हजार ६७५ रुग्ण बरे झाले होते. देशात रिकव्हरी दर ८२.१६ टक्के इतका आहे. देशाची एकूण रुग्णसंख्या २ कोटी २२ लाख ८४,३७१ वर गेली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा १ कोटी ८३ लाख १०,७२७ वर पोहोचला.
देशात सलग चौथ्या दिवशी ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. शनिवारी ४,०३,०९६ नव्या रुग्णांची भर पडली. यापूर्वी ७ मे रोजी ४ लाख ६ हजार ९०२, तर ६ मे रोजी ४ लाख १४ हजार २८० आणि ५ मे रोजी ४ लाख १२ हजार ६२४ नवे रुग्ण आढळले होते. शनिवारी देशभरात ४०८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नोंदवण्यात आले. यापूर्वी ७ मे रोजीही देशात ४,२३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशभरातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा वाढून ३७ लाख २९,८६७ वर पोहोचला आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रालाही काहीसा आशेचा किरण दिसलेला आहे. राज्यात काल दिवसभरात तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५० लाख ५३ हजार ३३६ वर पोहोचली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोनाचे ६ लाख २८ हजार २१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येल लक्षणीय घट झाली असून, मुंबईत आज कोरोनाच्या २ हजार ६७८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर ३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोना परिस्थितीत मोदी सरकारला काम करता येईना’, राष्ट्रवादीचा टोला
- गंभीर! ‘मराठा आरक्षणाच्या अहवालातील चार हजार पाने गायब’, भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ
- गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
