🕒 1 min read
नवी दिल्ली : रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची चाचणी केली जात होती आणि या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले जात होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली असून त्यानुसार कोरोना रुग्णालयात किंवा कोविड सेंडरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाला आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे बंधनकारक नसणार आहे.
Union Health Ministry revises national policy for admission of COVID patients to COVID facilities; requirement of a positive test for COVID-19 virus is not mandatory for admission to a COVID health facility pic.twitter.com/odbcXo8iI4
— ANI (@ANI) May 8, 2021
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘कोरोनाच्या संशयित रुग्णांना सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये ठेवता येऊ शकते. तसेच कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास किंवा त्याला औषधे, ऑक्सिजन यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यास नकार देता येणार नाही. रुग्ण दुसऱ्या शहरातील असला तरीही त्याला सेवा द्यावीच लागेल. एखाद्या रुग्णाकडे आधार कार्ड किंवा ओळखपत्र नसेल तर रुग्णालय त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नाकारू शकत नाही.’
काय आहेत नियम?
१ रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या रिपोर्टची गरज नाही
२ संशयित व्यक्तीही रुग्णालयात दाखल होऊ शकतो
३ कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्रं नाही म्हणून रुग्णालयात दाखल करण्यापासून रोखता येणार नाही
४ कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो
५ रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच रुग्णालयात दाखल केलं जाईल
६ रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसतानाही रुग्णांनी बेड अडवून ठेवले तर नाही ना, हे पाहणं बंधनकारक आहे
७ येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिलेत
दरम्यान, नव्या नियमांनुसार रुग्ण कोणत्याही शहरात राहणारा असला तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने सेवा देण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही समावेश आहे. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात केवळ वैध ओळखपत्रं नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असं नव्या नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुखद, सकारात्मक! देशात पहिल्यांदा एका दिवसात ३ लाख ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- ‘कोरोना परिस्थितीत मोदी सरकारला काम करता येईना’, राष्ट्रवादीचा टोला
- गंभीर! ‘मराठा आरक्षणाच्या अहवालातील चार हजार पाने गायब’, भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ
- गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
