Share

‘कोरोना परिस्थितीत मोदी सरकारला काम करता येईना’, राष्ट्रवादीचा टोला

Published On: 

मुंबई: कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून हतबलही झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे आणि वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. लस संपल्याने आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणीवपूर्वक केंद्र सरकार अन्याय करतेय की, त्यांना काम करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मलिक म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. पण मोदी सरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे. राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्य परिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा 50 टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे.

रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाहीये, लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर लस द्या, ५० टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!