Share

“सगळी गद्दारांची फौज आहे” ; अनिल बोंडेंची काँग्रेवर टीका

Published On: 

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसची तक्रार फेटाळून लावल्यानंतर भाजप नेते काँग्रेवर टीका करत आहेत. काँग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान केला. काँग्रेसला निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार? सगळी गद्दारांची फौज आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनीही काँग्रेसला लाथाळलं, अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा निकाल थोड्या वेळाने येईल. दुपारी 4 वाजता 285 आमदारांनी मतदान पूर्ण केले. सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला मेल करून भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला आणि ही मते रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने बैठक सुरू केली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसची तक्रार फेटाळून लावली.

दरम्यान, अर्धा तास उलटून गेला तरी मतमोजणी सुरू होऊ शकली नाही. आता या विषयावर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक सुरू होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होणार आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने तक्रार फेटाळल्यानंतर काँग्रेसने या तक्रारीला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान केल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप घेतला. हे गुप्त मतदान पद्धतीच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

मात्र भाजपच्या वतीने भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी सांगितले की, विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. तरीही या दोन्ही आमदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याची इच्छा व्यक्त करत रुग्णवाहिकेने विधानभवन गाठले. त्यांना मतदानात मदत करण्यासाठी पक्षाने विधिमंडळाच्या मुख्य सचिवांची आधीच परवानगी घेतली होती. त्यामुळे या मतावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही.

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना कंपॅनियनची गरज लागेल. पाहताक्षणी कुणाच्याही सहज लक्षात येईल. त्यामुळे आम्ही व्हीलचेअर आणि कंपॅनियनसाठी निवडणूक आयोगाकडून रीतसर पूर्व परवानगी घेतली होती. तरीही काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी आणि काँग्रेसची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!