Share

कलम ३७० ला विरोध करणं भोवलं; राजीनामा देत कॉंग्रेस खासदाराचा सरकारला पाठींबा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

यावरून कॉंग्रेसने या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे कॉंग्रेसच्याचं भुवनेश्वर कलिता या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संबंधी कलिता यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ‘काँग्रेसने आज मला काश्मीर मुद्द्यावरून व्हीप जारी करण्यास सांगितले. परंतु देशाची भावना पूर्णपणे बदलली आहे, हेच सत्य आहे. काँग्रेसचा हा व्हिप जनभावनेविरुद्ध आहे. कलम ३७० बद्दल बोलायचे झाल्यास, पंडित नेहरूंनी स्वत: याच्याविरोधात म्हटले होते की, कलम ३७० एक दिवस घासून-घासून पूर्णपणे बाजूला होईल.

तसेच आज काँग्रेसच्या विचारधारेवरून वाटते की, काँग्रेस आत्महत्या करत आहे. मी यात काँग्रेसचा भागीदार बनू इच्छित नाही. मी या व्हिपचे पालन करणार यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे. आज काँग्रेसचे नेतृत्व काँग्रेसला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहे. आता या पक्षाला उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे माझे मत आहे अस त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, आम्ही जम्मू – काश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतो. जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदेल आणि विकास होईल, अशी आमची आशा आहे, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेचे ३७० वे कलम रद्द करण्याच्या सरकारने केलेल्या शिफारसीला पाठींबा दिला आहे.

मोठी बातमी : ३७० कलम हटणार, तर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनणार

#Article370 : लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने ओमर अब्दुल्ला यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे

३५अ’च काय संपूर्ण ३७० कलम हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!