Share

भारताने सामना जिंकला मात्र कर्णधार रोहित नाराज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळूनही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसला. त्याने संघातील काही खेळाडूंवर राग दर्शवला आहे.

पहिल्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य दिले होते. जे टीम इंडियाने पूर्ण केले. परंतु यादरम्यान काही खेळाडू धावा करण्यास अपयशी ठरले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली १७ धावा करून बाद झाला आणि ऋषभ पंत ८ धावा करून बाद झाला. या दोन्ही फलंदाजांच्या खराब फलंदाजीमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र नंतर सूर्यकुमार यादव आणि व्यकंटेश अय्यरने पारी सांभाळली.

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने नाव न घेता संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला ” फलंदाजांना अजून थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. इथूनही खूप काही शिकायला मिळाले. श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूला बाहेर ठेवणे खूप अवघड आहे, पण आम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा व्यक्तीची गरज होती जो मधल्या ओव्हरमध्येही गोलंदाजी करू शकेल.’ रोहितने यावेळी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र तो रागात दिसला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!