Share

मनपाने शिवजयंतीचे बॅनर हटवल्यानंतर आक्रमक शिवप्रेमींपुढे औरंगाबाद प्रशासन अखेर नरमले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी होणार आहे. मात्र अनावरनाची वेळ मध्यरात्री १२ वाजताची ठेवण्यात आली होती. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांवर बंदी आहे. मग १२ वाजता राजेंचे आगमन शांततेत कसे पार पडणार? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला. त्यात नवीन वाद म्हणजे काल मध्यरात्री शिवजयंतीचे बॅनर काढल्याने चांगलाच वाद पेटला.

काल रात्री मनपा अधिकाऱ्यांनी शिवजयंतीनिमित्त लागलेले शुभेच्छांचे बॅनर क्रांतीचौकातून काढले. याप्रकरणीच मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, अधिकाऱ्यांनी तिथून पळ ठोकला. याप्रकरणीच मनसेने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अखेर प्रशासनाने ‘तो’ निर्णय बदलला-

दरम्यान पुतळा अनावरणाची वेळ, तसेच इतर निर्बंध याबाबत वाद- विवाद होत असतानाच महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे(Municipal Commissioner Astik Kumar Pandey) यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार आहे. अशी माहिती आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिली आहे.

तसेच या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. तर बॅनरमुळे झालेल्या वादावर तोडगा म्हणून बॅनर लावण्यासाठी महापालिका शिवप्रेमींना जागा उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान या तोडग्यावर शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!