Share

राजकीय कार्यक्रमांना जल्लोष! शिवजयंतीला का नाही? सरकारचे शिवजयंती विरोधी धोरण

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन वर्षापासून राज्यात शिवजयंती साजरी झाली नाही. त्यामुळे शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. शिवजयंती आली की सरकारचे नवे नियम जारी होतात. राजकीय सभांना मुभा आणि शिवजयंती म्हटल की सरकारला नको वाटते. त्यामुळे कोरोनाचे कारण सांगत नवीन निर्बंध लादले जातात आणि शिवजयंती साजरी करण्यापासून रोखले जाते, असा थेट आरोप करण्याचे कारण की राजकीय सभांना होणारी गर्दी तुम्ही पाहली आहे. विरोधक असो वा सत्ताधारी यांच्या सभांना मोजणेही शक्य होत नाही ऐवढी गर्दी असते.

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तसेच शिवजयंती सोहळ्यास उपस्थित सर्वांनी सामाजिक अंतर, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, मात्र हे सर्व नियम मास्कसुद्धा न घालनाऱ्या राजकीय लोकांना लागू होत नाहीत का?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

राजकारण्यांकडून कोरोना नियमांची हत्या

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेला झालेली गर्दी कोरोना नियमांची एकप्रकारे हत्या होती. हे सरकारला अपेक्षीत आहे का?, आणि शिवप्रेमींनी साधे शुभेच्छांचे बॅनर देखील लावले तर प्रशासनाच्या जिव्हारी लागते. काल औरंगाबादेत रात्री १२ वाजता मनापाने शिवप्रेमींनी लावलेले बॅनर काढण्यात आले. मग राजकारण्यांच्या अभिनंदनासाठी लावलेले शुभेच्छांचे बॅनर प्रशासनाला चालतात का? की तिथं हात कमाई असते. गेले दोन वर्ष सरकार शिवजयंती विरोधी धोरण आखत आहे. शिवजयंती आली की यांना नियम, कायदे आठवतात. स्वता मात्र हे मोकाट फिरतात. त्यामुळे नियम फक्त सामान्यांनाच का?, असा प्रश्न निर्माण होतो.

शिवजयंती साजरी करण्याबाबत शिवसेनेत मतभेद

सत्तेत असलेल्या शिवसेनेत शिवजयंती साजरी करण्याबाबत मतभेद दिसून येत आहेत. दरवर्षी शासकीय नियमांनुसार शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी तर फक्त शिवसेना तिथीने म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी करते. त्यामुळे सर्वात मोठी शिवजयंती साजरी करणार असल्याची घोषणा केलेली शिवसेना शिवजयंती कधी साजरी करणार हा मोठा प्रश्न आहे. की शिवसेनेला तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही त्यामुळे निर्बंध लादले जातात, असा सुद्धा आरोप होत आहे.

राज ठाकरेंची भूमिका काय?

शिवजयंती तिथी प्रमाणे की तारखे प्रमाणे याबद्दल राज ठाकरे यांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार या वादावर औरंगाबादेत बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं होत की, “मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसा साजरी करायची की तिथीनुसार असं विचारलं होतं. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनुसार का याबद्दल सांगायचं झालं तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे”.

यामध्ये राज ठाकरेंच्या दोन भूमिका दिसून येतात. तसेच त्यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याला महत्व दिल आहे. त्यामुळे राज ठाकरे सरकारच्या निर्बंधांवर गप्प आहेत का? की ३६५ दिवस शिवजयंती साजरी करा सांगणारे राज ठाकरे आपली भूमिका मांडतील?, याकडे शिवप्रेमिंचे लक्ष लागले आहे.

राजकीय नेत्यांच्या अपमानासाठी उभे राहणारे नेते राजेंच्या उत्सवासाठी पुढाकार घेतील का?

राजकीय नेत्यांचा अपमान झाला म्हणून राज्यभर कार्यकर्त्यांकडून निषेध केला जातो. आंदोलन केली जातात. मग शिव छत्रपतींच्या उत्सवासाठी हे राजकीय नेते पुढाकार का घेत नाहीत? असा सवालही यानिमिताने तयार होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सण- उत्सवांवर निर्बंध राहिले आहेत. मात्र यंदा कोरोना संक्रमण कमी होताना दिसत असताना ठाकरे सरकराने निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा शिवजयंती उत्सवही धूमधडाक्यात पार पडणार असला तरी संख्येतील मर्यादेवरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!