Share

“सीता मातेचे चीरहरण…” ; रणदीप सुरजेवाला यांची जीभ घसरली, भाजपची टीका

Published On: 

🕒 1 min read

उदयपूर : काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे एका वादग्रस्त विधानाने घेरले आहेत. पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी ‘सीता मातेचे चीरहरण’वर भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी मुद्दा बनवला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप मीडियावर करत होते, त्याचवेळी त्यांची जीभ घसरली आणि ‘द्रौपदीचं चिरहरण’ ऐवजी ‘सीता मातेचे चिरहरण ‘ असं म्हटलं आहे.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, “गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. लोकशाही, कायदा आणि नैतिकता यांचा विजय होईल. एके काळी ‘सीता मातेचे चिरहरण’ घडले. तसे या लोकांना लोकशाही बाबत करायचे आहे. असे लोक पराभूत होऊन उघडे पडतील.”

खरे तर रणदीप सुरजेवाला यांना महाभारतातील द्रौपदीच्या चिर हरणाच्या घटनेचा उल्लेख करायचा होता. पण चुकून त्यांच्या तोंडून ‘सीता मातेचे चीरहरण’ निघाले. नुकतेच नुपूर शर्मा यांच्या विधानाने घेरलेल्या भाजपला संधी मिळाली आणि पक्षश्रेष्ठींनी रणदीप सुरजेवाला यांना घेरले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!