बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यावरून काँग्रेसने मेटेंवर टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा हा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे. मराठा समाजाचा मोर्चा असता तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, असं काँग्रेसने म्हटलं होते.
यानंतर मेटे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ‘१९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला.
मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांचे पोट दुखत आहे. त्यामुळे अनेक जण याला विरोध करत आहेत. हे चुकीचे आहे. काँग्रेसचा हा विरोध मराठा समाजाबद्दल असलेला आकस दाखवून देणारा आहे. मराठा समाज आणि महाराष्ट्राबद्दल काँग्रेसचे धोरण विरोधी राहिलेलं आहे असा आरोप करत कोणी विरोध केला तरी मोर्चा निघणारच असे मेटे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे फक्त विसर्जन बाकी
काँग्रेसचे नेते जे कोणी आरोप करत आहेत, त्यांनी जरा पाठीमागे पाहावे. काँग्रेसचे आता फक्त विसर्जन करणे बाकी आहे. काँग्रेस अशोक चव्हाणांच्या नादी लागून महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण करणार आहे. पण माझं अशोक चव्हाणांना खूले आव्हान आहे. त्यांनी मराठा आरक्षणावार समोर येऊन बोलावं.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
- ‘..ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू’, संभाजीराजेंचा इशारा


