Share

“मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर 5 वर्षे काहीच बोलत नाहीत”

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘अनेकांना वाटलं असेल की मी टीव्हीवर बोलत आहे म्हणजे फक्त कोरोनावर बोलणार आहे. तशी आवश्यकता लागली तर काही दिवसांनी बोलेल. आजच्या महत्त्वाच्या निर्यणातून मला व्यक्तीशाह अस्सल मुंबईकर, शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आनंद होत आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळेमुळे आहेत ती विसरून चालणार नाही’, असे मुख्यमंत्री सांगत होते.

‘1966 पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना आज कित्येक वर्षे मुंबईकरांच्या आशिर्वादाने मुंबई सांभाळत आहे. शिवसेना प्रमुखांनी सुरु केलेले काम आज आम्ही पुढे नेत आहोत. मी सुद्धा नालेसफाईचे काम नाल्यामध्ये उतरून पाहिले आहे. आता माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे. मुंबईकर म्हटल्यावर फक्त त्यांनी करच भरायचे का? दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. जनतेच्या कष्टातून सगळी कामे होत असतात. आपण ते काम केले आणि त्याची मोठी जाहिरात करायची ते मला स्वतःला पटत नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर 5 वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत. आता नवीन मित्र सोबत आले आहेत. तिघे मिळून आपण पुढे जात आहोत. इतर पक्ष आम्ही हे करु असे म्हणतात आणि कालांतराने तेही विसरतात आणि लोकसुद्धा विसरतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

खोटं बोलायचं नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे. जे जमणार नसेल ते निवडणुक जिंकण्यासाठी उपयोगी पडणार असेल तरीसुद्धा खोटं वचन द्यायचं नाही ही आपली परंपरा आहे. हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे चांगलेच कान टोचले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!