Share

तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा

Published On: 

मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही शपथनामा कोणती हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन लिहिला नाही, मग जे सांगितले त्यावर कृती करणे महत्त्वाचे आहे, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

एसटी कामगारांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही आपल्या शपथनाम्यात हे निश्चित देऊ असं सांगितलं. एसटी कामगारांच्या संमेलनात जाऊन तुम्ही मोठी मोठी भाषणं केली. शरद पवार स्वतः आणि अनिल परब यांनीही एसटी कामगारांना राज्य आणि केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ असे सांगितले, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

तुम्ही शपथनाम्यात जे लिहिता ते कोणती हर्बल वनस्पती घेऊन लिहिले जात नाही. कोणत्या क्रुझ पार्टीत ड्रग्जचे सेवन करून लिहिले जात नाही. मग अशा प्रसंगात जे तुम्ही सांगितले त्यावर कृती करणे महत्त्वाचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!