Share

जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिमची जोरदार चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला धूळ चारली. राणे आणि शिवसेनेचे राजकीय वैर काही नवं नाही. भाजपने एकूण 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. या विजयाने भाजपला चांगलंच बळ आले आहे. शिवसेनेसाठी ही मोठी चपराक असल्याचे बोललं जात आहे.

भाजपच्या या विजयानंतप आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा चांगलाच चर्चेचा ठरला आहे. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दिसत आहे. तर फोटोतील वाघ हा त्या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र नारायण राणे त्या वाघाला त्याची शेपटी धरून बाहेर फरफटत नेताना दिसत आहे. या वाघाला नारायण राणे बँकेपर्यंत पोहोचू देत नसल्याचे या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे.

या फोटोच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असून सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रभर हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्याचेही पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!