Share

‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षानिमित्त १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता वर्ग करण्याची घोषणा केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यावर भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी ट्विट करत मोदींचे आभार मानले आहे.

यासंदर्भात ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले आहेत की,’नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटींहून अधिक अन्नदात्या शेतक-यांच्या खात्यात २० हजार कोटींची रक्कम थेट जमा करत मोदी सरकारने बळीराजाप्रती वचनबद्धता पुन्हा सिद्ध केली आहे. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्यासोबतच ३५१ एफपीओंना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही जारी केली आहे. याचा १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे’, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात ट्विट करत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘नववर्ष, २०२२ चा पहिला दिवस देशातील अन्नदात्यांना समर्पित राहील. दुपारी १२:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसानचा १० वा हप्ता जारी करण्याचे भाग्य लाभेल. याअंतर्गत २० हजार कोटी रुपयांच्या हस्तांतरणामुळे १० कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!