🕒 1 min read
मुंबई : बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही समाज कंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतला. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता यातच काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (revolutionary Sangoli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजपशासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2021
तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- कदम कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांची किंमत शून्यच; निलेश राणेंची जहरी टीका
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘हे हारमखोर, बेईमानी मंत्री राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांसोबत मला आणि शिवसेनेला संपवण्याचा घाट घालत आहेत’
- अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; सहकार वाचवण्यासाठी सांगितला नवा प्लान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
