Share

कदम कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांची किंमत शून्यच; निलेश राणेंची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आज शिवसेने(Shivsena)चे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या पत्रकार परिषदेत उफाळून आले आहेत. रामदास कदम परिवहन मंत्री अनिल परबांना हरामखोर म्हणाले आहेत. रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अक्षरश: अनिल परब यांच्या बापाचाही उल्लेख केला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे.

रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील वाद आता उघड वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ‘अनिल परब यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. हवा गेली. त्यांचे पाय जमिनीवर नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ‘या हरामखोराला आवरा’, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. या सर्व प्रकरणावर भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास कदम यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे, असे निलेश राणे म्हणाले आहेत. रामदास कदम यांनी राणेंवर टीका करण्याचे काम केले कारण त्यांना ‘मातोश्री’तून बक्षीस हवे होते. रामदास कदम ते विरोधी पक्षनेते पद मिळवले आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होते आणि आज त्यांची शिवसेनेमध्ये ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्य आणि ती त्यांनीच करून घेतली आहे. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही, हे रामदास कदम यांना आता कळून चुकले असेल, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!