मुंबई: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना काळात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’ वरूनच राज्याचे कामकाज सांभाळले. गेल्या काही काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात आला. परंतु आता आगामी काळात मुख्यमंत्री स्वतः महाराष्ट्रात फिरून विविध कामे करणार आहेत. तसेच ते लवकरच ‘शिवसंपर्क अभियान’ राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, “आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण तेव्हा कोरोनाची लाट आली. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”. आगामी निवडणुका लक्षात घेऊन येत्या 22 मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन पक्ष बांधणी करणार आहेत. २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भाजपला सवाल
भाजप नेहमीच शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून आरोप करत असते. त्यामुळे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. ते सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:


