Share

बियाणांच्या पाकिटाच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Published On: 

औरंगाबाद : सध्या कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कापसाचे दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या बियाणाच्या दराचा सामना करावा लागणार आहे. यंदा कापसाला विक्रमी असा 11 रुपये क्विंटलचा दर मिळाला त्यामुळे आगामी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र दिसत असतानाच ‘बीजी 2’ या बियाणाच्या पाकिटाच्या दरात तब्बल 43 रुपयांची वाढ करण्याचा अधिसूचनाच सरकारने काढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियानांबाबद मोठा खर्च होणार आहे.

बियाणे दरात वाढ होण्याची शक्यता बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ‘बीजी 1’ चे दर आहे तेच ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अधिकची मागणी असलेल्या ‘बीजी2’ या बियाणे पाकिटात तब्बल 43 रुपायांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता वाढीव दरात कापसाची विक्री केली तर वाढीव दरानेच बियाणे खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार आहे.

कापूस बियाण्याचे दर वाढलेले आहेत. या वर्षी पासून नवीन दराची अंमलबजावणी होणार आहे. ‘बीजी1’ आणि ‘बीजी2’ या बियाणांची निर्मिती करणाऱ्या देशभर कंपन्या आहेत. बियाणे तयार करण्यासाठी होणारा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे ‘बीजी2’ हे बियाणाचे पाकीट मागच्या वर्षी 767 रुपायांना होते. ते आता 810 रुपायांना मिळणार आहे. यामध्ये 43 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीच्या अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण विभागाने काढलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!