मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनीही यावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
“शिवसेनेचा नवा मित्र AIMIM पक्ष. ज्या पक्षाला हिंदूच्या नावाची सुद्धा चीड आहे. काही तासांसाठी पोलिस काढा तर हिंदूंना कळेल आमची ताकत असं जाहीर भाषणात बोलणारे, गाय आम्ही खाणारच बोलणारे, भारत माता की जय म्हणणार नाही बोलणार्यांना आज शिवसेना त्यांच्या जवळ वाटू लागली आहे.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्विट करत लगावला आहे.
शिवसेनेचा नवा मित्र AIMIM पक्ष. ज्या पक्षाला हिंदूच्या नावाची सुद्धा चीड आहे. काही तासांसाठी पोलिस काढा तर हिंदूंना कळेल आमची ताकत असं जाहीर भाषणात बोलणारे, गाय आम्ही खाणारच बोलणारे, भारत माता की जय म्हणणार नाही बोलणार्यांना आज शिवसेना त्यांच्या जवळ वाटू लागली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 20, 2022
दरम्यान जलील यांच्या ऑफरवर शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत” तसेच आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे त्यामुळे जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा. असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –


