औरंगाबाद : ज्या मैदानावर हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी सभा गाजवली होती, त्याच मैदानावर आज मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी पाणी प्रश्नावर मोठे वक्तव्य केले.
मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच जे कोणी माफिया येतील त्यांना हातात दंडा घेऊन दूर करा आणि योजना पूर्ण करा. मधील काळात किंमती वाढल्या, परंतु या योजनेच्या खर्चाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. एक पैसा कमी पडू देणार नाही. असे म्हणत त्यांनी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना आदेश दिले आहेत.
यावेळी त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे- संजय राऊत
- “भाजपच्या नामर्द लोकांनी काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा” – संजय राऊत
- IND vs SA 2022 : केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर, ‘या’ युवा खेळाडूकडे संघाचे कर्णधारपद
- “किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरेंवर टीका केली तर…” ; चंद्रकांत खैरेंचा इशारा
- “रावसाहेब दानवेंचा राजकीय वध करू द्या” ; अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती


