🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारपासून इंडियन प्रीमियर लीगनंतर पहिली टी-20 मालिका खेळायचे आहे. या मालिकेच्या एक दिवस अगोदर भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदी निवड झालेल्या केएल राहुलला दुखापतीमुळे माली के बाहेर पडावे लागले आहे. कर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नसल्याची माहिती बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी दिली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. संघाला आपला पहिला सामना गुरुवार ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळायचा आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार बनवण्यात आलेल्या राहुलला दुखापत झाली. या मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली होती. सध्याच्या मालिकेसाठी निवड समितीने या युवा यष्टीरक्षकाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.
KL Rahul has been ruled out of the T20I series against South Africa owing to a right groin injury while Kuldeep Yadav will miss out in the T20I series after getting hit on his right hand while batting in the nets last evening.
More details here – https://t.co/KDJwRE9tCz #INDvSA
— BCCI (@BCCI) June 8, 2022
२४ वर्षीय पंत कर्णधार असेल
युवा ऋषभ पंतला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये फ्रँचायझी संघ दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. त्याला टी-२० सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या मोसमामध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पंड्याने संघाला ट्रॉफी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
