Share

…असाच चमत्कार २०२४ नंतर दिल्लीत घडवला पाहिजे- छगन भुजबळ

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस (Sharad Pawar ) असून त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आज २०२४ मध्ये दिल्लीत बदल होणार असल्याचा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४ साली दिल्लीत होईल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे होते. साहेबांना समजून घ्यायचे असेल तर लोक माझे संगती आणि नेमकेची बोलावे ही पुस्तके वाचावीत. त्यांनी राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात पवार साहेबांचे मोलाचे काम केले. कुस्तीला, क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. ते स्त्री- पुरुष समानता मानणारे आहेत. शरद पवार यांच्यावर अनेक वैचारिक हल्ले झाले पण त्यांनी संयम ठेवला. कृषी मंत्री म्हणून मोलाचे काम त्यांनी केले आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!