मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसही आहे. सर्व स्तरातून शरद पवारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने देखील शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशातील सर्वात उंचीचा नेता आणि महाराष्ट्राला घडवणारे, दूरदृष्टी असणारे माननीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. साहेब तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे रितेश देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
रितेशने दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सोबत असलेला शरद पवारांचा फोटो पोस्ट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने हा फोटो पोस्ट करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमी राजकीय तसेच सामाजिक विषयांवर सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
Wishing one of the tallest leaders In India and a visionary who shaped Maharashtra Hon Shri @PawarSpeaks Saheb a very happy birthday . May god bless you with great health and long life sir…. #SharadPawarSaheb pic.twitter.com/0T7pqqvdLl
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 12, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या बॅनरबाजीवरून नितेश राणे आक्रमक;म्हणाले,’शिवसेना हा नाच्यांचा…’
- कोहली कर्णधारपदावरून हटताच अश्विनचे चांगले दिवस; रोहितने सांगितली मोठी गोष्ट
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन

