🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करेक्ट बाराच्या ठोक्याला ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचा आधारवड, आमच्या सर्वांच्या जीवनातील सूर्य आदरणीय शरद पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
भारताचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे आधारवड, आमच्या सर्वांच्या जीवनातील सूर्य आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!@PawarSpeaks pic.twitter.com/0ljFUcCVEL
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 11, 2021
जयंत पाटील ट्विट करत असताना मंत्री जयंत पाटील यांनी पवारांसोबतचे जुने फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत तर शरद पवारांनी फार कमी वयात जयंत पाटील यांना अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
पक्षाचा पडता काळ असतानाही शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. जयंत पाटील यांनीही जबाबदारी पेलत पक्षाची संघटना बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन
- द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ आज मुंबईत होणार दाखल
- …तर त्यांना रात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?- गोपीचंद पडळकर
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
