मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस (Sharad Pawar ) असून त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात बोलताना आज देशात वैचारिक लढाई उभी करण्याची गरज असल्याचे मत नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) प्रमुख मागण्यासाठी काल मुंबईत चांदिवली सभास्थळी घेण्यात आली त्याविषयी देखील नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही लोक काल मुस्लिम आरक्षण का नाही दिले असा प्रश्न विचारत होते, शरद पवार यांनी मुस्लिमांना आरक्षण दिले पण ते भाजपने रोखले’, असा गंभीर आरोप यावेळी नवाब मलिकांनी केला आहे.
दरम्यान, आज संपूर्ण देश शरद पवारांकडे पाहत आहे. देशात एक वेगळीच विचारधारा आणून विष पेरण्याचे काम करत आहे. जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात एक वैचारिक लढाई सुरू करण्याची गरज आहे. योद्धा हा महान असतो आणि शरद पवार हे आमचे महान योद्धा असून ते ही लढाई नक्की जिंकतील असा विश्वास आम्हाला आहे. केवळ शरद पवार यांच्या विचारधारेवर आपण ही लढाई लढू शकतो, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दि. विलासराव देशमुखांसोबतचा हा फोटो पोस्ट करत रितेशने दिल्या पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- शिवसेनेच्या बॅनरबाजीवरून नितेश राणे आक्रमक;म्हणाले,’शिवसेना हा नाच्यांचा…’
- कोहली कर्णधारपदावरून हटताच अश्विनचे चांगले दिवस; रोहितने सांगितली मोठी गोष्ट
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन

