मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद चांगलाच वाढत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. त्यातच शिवसेनेने आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केल्याने हे प्रकरण अजूनच चिघळले आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली असून शिवसेना हा नाच्यांचा पक्ष असल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे.
यासंदर्भात नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’मुंबईच्या महापौर किशोरी ताईंबद्दल जे वक्तव्य आमच्या आशिष शेलार यांनी केलेच नाही त्याबद्दल शिवसेनेला जास्तच मर्दानगी सुचली आहे. रात्रीच्या वेळी लिहायचं आणि आमच्या भाजप कार्यालयासमोर बॅनर लावायचा आणि स्वतःला वाघ म्हणून मॅऊ मॅऊ करायचं,ही आता नवीन शिवसेना झालेली आहे. नाच्यांचाच पक्ष उरलाय शिवसेना ज्याच्यामध्ये वरपासून ते खालपर्यंत सर्व याचेच आहेत. शिवनेने जे बॅनर लिहिणारे आहेत त्यांची नावं खाली लिहिली असती तर नाच्या कशाला म्हणतात हे आम्हीही त्यांना दाखवून दिल असत.’
@ShivSena pic.twitter.com/6Q7G2JSPqp
— Nitesh Rane (@NiteshNRane) December 12, 2021
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘आशिष शेलार यांच्या संदर्भात जी पोस्टरबाजी झाली ती मी पाहिली नाही.’ तसेच पुढे त्या म्हणाल्या की, जेव्हा दोन नेत्यांचा वाद होत असतो तेव्हा इतर जण याचा गैरफायदा घेत असतात. त्यामुळे हे नक्की कोणी केलंय हे तपासायला हवं.’
महत्वाच्या बातम्या
- …तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली- संजय राऊत
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- ‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला’

