Share

VIDEO : इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराचा धुमाकूळ..! साजरी केली ‘हॅट्ट्रिक’; पाहा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला कसोटीची नवी भिंत असे संबोधले जाते, परंतु श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघातही घेतले गेले नाही. पुजाराच्या फॉर्मवर सतत टीका होत होती. दरम्यान, इंग्लंडच्या भूमीवर पुजाराने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. द्विशतकासह चेतेश्वर पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावली आहेत.

उजव्या हाताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने काऊंटी क्रिकेट डिव्हिजन २च्या सामन्यात ससेक्ससाठी तिसरे शतक झळकावले. डरहॅमविरुद्ध त्याने दमदार खेळी केली. पुजाराने हे शतक १६२ चेंडूत पूर्ण केले. यापूर्वी त्याने काऊंटी क्रिकेटच्या या मोसमात एक शतक आणि एक द्विशतकही झळकावले आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले.

लागोपाठ तीन सामन्यांत तीन शतके झळकावल्यानंतर त्याने एकदा टीम इंडियासाठी आपला दावा ठोकला आहे. यामागचे कारण म्हणजे टीम इंडियाला आता पुढची कसोटी त्याच मैदानावर खेळायची आहे, ज्या मैदानावर चेतेश्वर पुजारा खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील उरलेल्या एका कसोटी सामन्यात भारताचा यजमानांशी सामना होणार आहे.

३४ वर्षीय चेतेश्वर पुजाराचे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील हे ५३ वे शतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने प्रथम श्रेणीच्या २२८ सामन्यांमध्ये ५१च्या सरासरीने १७२७६ धावा केल्या आहेत. यात ५२ शतके आणि ७० अर्धशतके होती. म्हणजेच त्याने १२३व्यांदा ५० हून अधिक धावांची इनिंग खेळली आहे. ३५२ धावा ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!