Share

राणेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी ‘हा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे असल्याचं सांगत बोलण्यास नकार दिला. नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ आहेत असं विधान केले. त्यामुळे नारायण राणेच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढे बोलताना पाटील यांनी ‘भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल असाच ते निर्णय घेतील. मात्र शिवसेनेची नारायण राणे यांच्याबाबत काही नाराजी असेल तर या संदर्भात मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांच्या ना हरकती नंतरच राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, येत्या १ सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी याआधीच स्पष्ट केलेआहे. तसेच त्यांच्यासह त्यांचे दोनही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षच भाजपमध्ये विलीन होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!