Share

मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : खा. नारायण राणे यांनी ‘नो होल्ड्स बार्ड’ या नावाने आपले इंग्रजी आत्मचरित्र लिहिले. त्याचे प्रकाशन एप्रिल महिन्यात झाले होते. आत्मचरित्राची मराठी आवृत्ती ‘झंझावात’ या नावाने तयार करण्यात आली. या मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी आत्मचरित्राविषयी बोलताना मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे, काही गोष्टी टाळल्या आहेत. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे. आम्ही पक्ष वाढवायला, वाचवायला काम केलं. आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही अस विधान केले.

तसेच शिवसेना सोडण्याच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की ‘मी साहेबांना ६ पानी पत्र लिहिलं मी शिवसेना सोडतो आहे. दुसऱ्या दिवशी साहेबांनी फोन केला. नारायण रागावला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन असं विधान केले. त्यामुळे शिवसेना सोडण्यामागे उद्धव ठाकरे यांची नाराजी होती हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पुढे बोलताना, आमदार झालो तेव्हा मंत्री व्हायचं होतं. मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री बनायचं होतं. ते झालो. आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय. पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं आहे असंही राणे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!