Share

धनंजय मुंडेंना पंकजाताई, प्रितमताई नाही, तर सुरेश धस पुरेसे आहेत : मुख्यमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे.

भाजपची महाजनादेश यात्रा ही बीड येथे आली असता मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी विकासाचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असं धनंजय मुंडे म्हणाले आणि त्यांनी जाहीर चर्चेचं आव्हान दिलं. पण धनंजय मुंडे यांना सांगायचंय की राज्याच्या मुख्यमंत्र्याने दिलेले आकडे कधीही खोटे नसतात हा इतिहास आहे असं विधान केले.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘त्यांना चर्चाच करायची असेल, तर त्यासाठी पंकजाताई, प्रीतमताई किंवा माझी गरज नाही, त्यांना आमचे सुरेश धस हेच पुरेसे आहेत असं विधान केले. तसेच राष्ट्रवादीने सुरुवातीला संघर्ष यात्रा काढली, पण त्यांच्यात संघर्ष करणारा एकही चेहरा नव्हता. त्यानंतर लोकसभेपूर्वी हल्लाबोल यात्रा काढली, जनतेने त्यांना निकालातून उत्तर दिलं असंही पुढे बोलताना म्हणाले.

दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या या सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यात पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!