मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. परंतु हे सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न मात्र अजूनही सुरूच आहेत. भाजपचे नेते मंत्रिमंडळातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. सध्या सुरु असलेले अधिवेशनही याच गोष्टींमुळे गाजत आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारमधील अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा विधिमंडळात माध्यमांशी बोलताना केला.
सध्या तपास यंत्रणा सरकारमधील काही मंत्र्यांची चौकशी करत आहेत. तसेच कारवाई देखील करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकार देखील भाजपच्या काही नेत्यांवर कारवाई करणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे अनिल देशमुख, अनिल परब, नवाब मलिक हे चौकशीच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा देखील दिला आहे. तर नवाब मालिकांच्या राजीनाम्याची भाजप सतत मागणी करत आहे. यातच आता पाटीलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
आम्ही घाबरत नाही…
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील असेही म्हणाले कि, “सध्या माजी ऊर्जामंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं झाली त्यांची चौकशी करा. तुमचं सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही.” असे खुले आव्हान पाटलांनी राज्य सरकारला दिले. तसेच २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये आहे आणि तरी तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाही, असे देखील ते म्हणाले
महत्वाच्या बातम्या:


