Share

“काश्मीर फाईल्सचे मोदी सर्वात मोठे प्रचारक”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या राजकारणातही चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज (१६ मार्च) शिवसेना खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता सर्व शिवसेना खासदार एकत्रित बैठक करणार आहेत. खासदारांना विभाग निहाय राज्यातल्या जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात हालचाली सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!