Share

IPL 2022: हार्दिक पंड्यासह दिसणार राहुल तेवतिया; संघातील भूमिका केली स्पष्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राहुल तेवतिया आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीत गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने त्याला ९ कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केले. यंदा राहुल तेवतिया, हार्दिक पंड्यासोबत भागीदारी करेल कारण दोघेही मधल्या फळीत खेळतील. याबाबत तेवतियाने उत्सुकता दाखवली आहे.

अष्टपैलू राहुल तेवतियाने (rahul tewtia) गुजरात संघातील आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले, “भूमिका मधल्या फळीप्रमाणेच राहील. फलंदाजीच्या दृष्टिकोनातून हार्दिक पंड्या (hardik pandya) आणि मी संघात आहोत आणि आम्हाला खूप जबाबदारी घ्यावी लागेल. तसेच आम्हाला मुंबई आणि पुण्यातील खेळपट्ट्यांवर खेळायचे आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या गोलंदाजीच्या प्लॅनवर चिकटून राहावे लागेल. आम्ही प्रथम फलंदाजी केल्यास, आम्ही शेवटच्या षटकात जलद धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पाठलाग करत असल्यास, आम्ही संघाला लक्ष्य कसे मिळवायचे याची तयारी करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

आयपीएलमध्ये ६, ७ आणि ८ व्या क्रमांकावरील फलंदाज खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ते मुख्यत्वे संघात फिनिशरची भूमिका बजावतात. याबाबत राहुल म्हणाला , “सांगितल्याप्रमाणे अष्टपैलूची भूमिका महत्त्वाची असते. ६,७ आणि ८ व्या क्रमांकावर खेळणाऱ्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यांच्याकडे कमी वेळ असतो परंतु प्रभाव पाडण्याची अधिक शक्यता असते. ही एक महत्त्वाची भूमिका आहे आणि आम्ही संघाला चांगल्या स्थितीत आणू शकतो.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!