🕒 1 min read
मुंबई: हैदराबाद येथील बायॉलॉजिकल इ. लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या कोर्बेव्हॅक्स या कोरोना लशीद्वारे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination for 12-14 year olds from today) आजपासून (१६ मार्च) सुरु झाले आहे.
दरम्यान आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी मुलांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र देशभरात दिसून येत आहे. बेंगळुरूमधील लसीकरण केंद्रात राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर आणि शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी उपस्थिती लावली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
“पात्र असलेल्या प्रत्येकाने लसीकरण केले पाहिजे. आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. आम्ही सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण केले आहे,” अशी प्रतिक्रिया गुजरात मधील तनु, शुभम आणि प्रिया यांनी दिली आहे.
दरम्यान देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण बुधवार, १६ मार्चपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री मंडाविया यांनी दिली आहे. दरम्यान देशात १२ ते १४ वयोगटातील सात कोटी ११ लाख मुले असून बायॉलॅजिकल ई लिमिटेड कंपनीने पहिल्या टप्प्यात कोर्बेव्हॅक्स लशीच्या पाच कोटी मात्रा केंद्राला दिल्या असून, राज्यांना त्यांचे वितरण करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मनसेचा दणका; कार्यकर्त्यांकडून IPL साठी आणलेल्या बसेसची तोडफोड
- “रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करताय”, संजय राऊतांचा प्रहार
- आशिया कप विषयी मोठी अपडेट; लवकरच येणार निर्णय!
- “चित्रपट आणि जीओ ची जाहिरात करून पंतप्रधान सेल्समन झाले असतील तर…”, सचिन सावंत यांचा टोला
- IPL 2022: टीम इंडियानंतर रोहित इंडियन्स संघात दाखल ; मुलगी समायरासह व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
