Share

आशिया कप विषयी मोठी अपडेट; लवकरच येणार निर्णय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आशिया कप २०२२च्या आयोजनाबाबत उत्साह वाढला आहे. आशिया कप कधी आणि कुठे आयोजित केला जाईल, याचा निर्णय या आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाईल. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही बैठक पुढे ढकलावी लागली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक होणार आहे. परिषदेचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार असून आशिया कपसह बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहे. यात सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी आणि ACC चे सदस्य मंडळ सहभागी होणार आहेत. श्रीलंकेला यंदाच्या आशिया कपचे यजमानपद मिळू शकते, असे मानले जात आहे. तथापि, ते अधिकृतपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेले असेल.

स्पर्धा श्रीलंकेत असून पाकिस्तान का आयोजित करेल या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, २०२२ च्या आशिया कप यजमानपदाचे अधिकार अधिकृतपणे पाकिस्तानकडे आहेत. परंतु आशियाई क्रिकेट परिषदेने ऑक्टोबर २०२१ मध्ये केलेल्या घोषणेनुसार आशिया चषक २०२२ चे यजमानपद आता श्रीलंकेला देण्यात आले आहे. याचे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमुळे भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही किंमतीत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!