मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की,महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करतील आणि दुसरे मुख्यमंत्री वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करतील. त्यांच्या याच वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
सुप्रिया सुळे तुम्ही काळजी करू नका, ते फिरतात पण आणि सरकारही उत्तम चालवतात, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलंच फटकारलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांचा मूळ स्वभाव हा प्रवास करणं, लोकांना भेटणं, लोकांचं ऐकणं असा आहे. तसेच 2014 ते 2019सया कार्यकाळात देवेंद्र फडणवीस अक्षरश: प्रशासन सांभाळून दर आठवड्याला तीन ते चार जिल्ह्यांचा दौरा करायचे. त्यामुळे ते दोघे खूप फिरत असल्याचं पाटील यांनी सांगितले.
प्रशासनाला काही गडबड आहे का? सगळं व्यवस्थित चाललं आहे. म्हणजे तुमच्या काळातील सर्व प्रलंबित कामं त्यांनी पूर्ण करत आणले आहेत. आता माझंचं उदाहरण घ्या, कोविडमध्ये ज्यांचे आई-वडील वारले, त्या विद्यार्थ्यांची फी माफ करणे, तुकड्या वाढवणं आणि नवीन महाविद्यालये देणं, ही उदाहरणं आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासन सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरही पडत नव्हता, असं म्हणत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah | “राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून…” ; अमित शहा यांचा हल्लाबोल
- Shivsena | शिवसेनेला पुन्हा धक्का! ‘हे’ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Vinod Tawde | विनोद तावडे यांच्यावर नितीशकुमारांचे चक्रव्यूह आणि महागठबंधन फोडण्याची जबाबदारी
- Nitesh Rane | “जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर”; नितेश राणेंचा हल्लाबोल
- Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र


