🕒 1 min read
पुणे : शुक्रवारी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा धक्कादायक घोषणा देण्यात आल्या होत्या. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. अशातच त्यावरून भाजप पक्षाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
तुमच्या अडीच वर्षांच्या काळात कसे हिरवे झेंडे लागले, त्रिपुरात मशीद पाडली अशी अफवा उठल्यानंतर मालेगाव-अमरावतीत 40-50 हजारांचा मॉब रस्त्यावर आला. हे विसरलात काय आदित्यजी?,की सरकार गेल्यामुळे तुम्ही एवढे विमनस्क अवस्थेत आहात की तुम्हाला आठवतच नाही की तुमच्या काळात काय काय झालं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक सवाल केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकल्पाचा एक घटनाक्रम असतो.तो आदित्य ठाकरे यांनी सांगावा.पण तुम्ही येथून कोणते कोणते प्रकल्प बाहेर घालवले,याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक यादीच जाहीर केली आहे. तसेच आहो,आपल्या अहंकारामुळे मुंबईची वाट लावली. मेट्रो प्रकल्पाचा खर्चही वाढला. त्यामुळे जो काही प्रकल्पांचा घटनाक्रम आहे,तो आमनेसामने मांडा, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
दरम्यान, पुण्यात हा गैरप्रकार घडला आहे. ज्यांनी कुणी या घोषणा दिल्या असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण नेमक्या याच सरकारच्या काळात कशा या घोषणा झाल्या? महाविकास आघाडीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “आदित्य ठाकरे हे खोटारडे असून…”; बावनकुळेंचा आदित्या ठाकरेंवर निशाणा
- Ajit Pawar | कार्यकर्त्यांसमोर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले…
- Eknath Shinde | पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले…
- Aditya Thackeray | “…तर मी सुद्धा निवडणूक लढवेन”; आदित्य ठाकरेंनी दिलं शिंदे गटाला आव्हान
- Gopichand Padalkar | “आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…”; पडळकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
