Share

Eknath Shinde | पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शुक्रवारी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा धक्कादायक घोषणा देण्यात आल्या. याप्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशातच या सगळ्याप्रकारावर अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केलं आहे. इतक्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे सूचक इशाराच दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतना ते म्हणाले,ही छत्रपती शिवरायांची पावनभूमी आहे. इथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्याचा कोणालाही अधिकार नाही. छत्रपती शिवरायांच्या भूमीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाहीत. हे देशभक्तांचे राज्य आहे.

तसेच, सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली असून, यामध्ये गृहविभाग, पोलीस विभाग अतिशय गांभीर्याने लक्ष देत आहेत.या देशात देशद्रोही लोकांना कुठलंही स्थान दिलं जाणार नाही. जे देशविरोधी, राज्यविरोधी कृत्य करत असतील त्यांचा योग्य समाचार गृहविभाग नक्कीच घेईल, असं शिंदेंनी सांगितलं.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे. त्यामध्ये त्यांनी पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!