पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी महावि सरकार असताना मला गृहमंत्री पद हवं होतं म्हणत आपल्या मनातील एक खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. अशातच या वक्तव्यावर स्वत: अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
मी माझ्या कार्यकर्त्यांना ते गमतीने म्हटलं होतं, असं सांगत अजित पवार यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविरोम दिला आहे. काल अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माझे कार्यकर्ते सारखे म्हणत होते की गृहमंत्रीपद तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे. म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं की मलाही पाहिजे होतं, पण नाही मिळालं. आता काय करता.
पुढे बोलतना पवार म्हणाले, सभेत जेव्हा लोक थकून रेंगाळतात तेव्हा सभेत बदल होण्यासाठी मी तसं बोललो होतो. मात्र, ते वक्तव्य माध्यमांसाठी नव्हतं तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी होतं. तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न होता. आमच्या वरिष्ठांनी कुठला विभाग कुणाला द्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.
तसेच,आत्ता पण बघा, हे जे सरकार आलं आहे, त्यात अनेकांना वेगवेगळे विभाग पाहिजे होते. परंतू त्यांना नाही मिळाले. नाईलाजास्तव त्यांना ते विभाग घ्यावे लागले आणि आता एक एक दिवस ढकलत आहेत, असं म्हणत पवारांनी सत्ताधारी नेत्यांना कोपरखिळी मारली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय याकडे आहे, मात्र उद्योग…”, आदित्य ठाकरेंचा आक्रोश
- Monica O My Darling | राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांची डान्स फ्लोअरला धूम, मोनिका ओ माय डार्लिंगचा टीझर रिलीज
- Chandrashekhar Bawankule | “बारामती मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले इरादे
- Viral Video | लग्नापूर्वी नववधू वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये पोहोचली, पहा व्हिडिओ
- Music Therapy Benefits : गाणी ऐका आणि निरोगी राहा! होय, संगीतामुळे राहू शकता तुम्ही तंदुरुस्त


