Share

Chandrashekhar Bawankule | “आदित्य ठाकरे हे खोटारडे असून…”; बावनकुळेंचा आदित्या ठाकरेंवर निशाणा

Published On: 

पुणे : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काल पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात होता. त्यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केल्या. त्यांच्या या टीकेबाजीला भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

आदित्य ठाकरे हे खोटारडे असून त्यांनी राज्य सरकारवर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत,असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे. केवळ सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ही आंदोलने होतं आहेत. सध्याचे आंदोलन म्हणजे इव्हेन्ट मॅनेजमेंट झाले असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना वेदांता प्रकल्प हा तळेगावातच होणार होता तर त्यासाठी घेतलेली जागा त्यांनी दाखवून द्यावी, असे आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे.

राष्ट्रवादीमध्ये लवकरच स्फोट होईल –

तसेच, बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. राष्ट्रवादीमध्ये सध्या सर्वकाही व्यवस्थित वाटत असले तरी या पक्षामध्येही मनभेद झालेले आहेत. योग्य वेळी या पक्षामध्येही राजकीय स्फोट होईल असा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!