Share

Gopichand Padalkar | “आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…”; पडळकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने पुणे, वडगावमध्ये काल जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अशातच ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?

आदित्य ठाकरे यांची अवस्था ‘बैल गेला आणि झोपा केला’, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी तो बोलत होते.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, विश्वासघाताने त्यांच्याकडे सत्ता आली होती. अडीच वर्षे या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या घरात होतं आणि ते स्वत:ही कॅबिनेट मंत्री होते. पण जेव्हा महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या आधाराची गरज होती. लोकांना ऑक्सीजन बेड मिळाले नाहीत. अनेक लोकांचा उपचाराविना मृत्यू झाला.

या संकटाच्या वेळेत यांनी लोकांना आधार देणं, आवश्यक होतं. पण त्यावेळी आदित्य ठाकरे घराबाहेर पडले नाहीत. आता सगळं त्यांच्या हातून गेलं असताना ते लोकांमध्ये जात आहेत. याचा त्यांना काही उपयोग होईल, असं मला वाटत नसल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!