मुंबई: राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथे अटक केली आहे. या आरोपीने व्हॉट्सअॅप संदेशात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
दरम्यान बंगळूरु येथून ३४ वर्षीय आरोपी जयसिंह राजपूत याला अटक करण्यात आली आहे.आरोपीने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता.त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्याने तीन आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचे कॉलही केले होते.
याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यात आला असून जयसिंह राजपूत याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यभर दौरे करावे, निदान त्यामुळे तरी रस्ते गूळगूळीत होतील’
- आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील
- विराट कोहली बॉक्सिंग डे टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला देणार संधी?
- प्रियंका गांधींच्या ‘त्या’ आरोपांवर केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
- नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांची तक्रार; ‘त्या’ ट्वीटमुळे शिवसैनिक आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

