Share

‘त्याला माहित असावं माफी नाही मागितली तर फटके मिळतील म्हणून…’, निलेश राणेंची टीका

Published On: 

मुंबई: विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. तसेच माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला. यावर दोन वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर अखेर भास्कर जाधवांनी माफी मागितली.

दरम्यान यासर्व प्रकरणी आता भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर टीका केली आहे. ‘काल शिवसेना आमदार भास्कर जाधव ने उगाच स्वतःचं ढुंगण शेकून घेतलं, पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर माफी मागायची ही जाधव ची जुनी सवय. इतकी भीती वाटते तर लायकीत राहून तोंड उघडायचं, त्याला माहित असावं माफी नाही मागितली तर फटके मिळतील म्हणून शहाणा झाला.’ असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान पंतप्रधानांनाबाबतचे अंगविक्षेप जे करत आहेत, ते सहन केले जाणार नाही. आम्हीही उद्या यांच्या नेत्यांची नक्कल केली तर सभागृहाला चालेल का. देशाचे पंतप्रधानांबाबत असं बोलणं सहन केले जाणार नाही. जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. तुमच्या नेत्यांचा आम्ही अवमान करायचा का, आम्हालाही नकला येतात. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान जाधव करत असतील तर ते सहन केले जाणार नाही. असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच चर्चेचा ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!