🕒 1 min read
Chandrakant Khaire । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत. 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. मंत्रिमंडळ अजूनही स्थापन झालं नाही. यावरून आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय.
चंद्रकांत खैरे म्हणाले कि, सध्या सुरु असलेलं शक्ति प्रदर्शन हे खोटं आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये वाद होणार आहेत. येणाऱ्या काळात त्यांना कळेल की इथे दिल्लीचा कंट्रोल आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावाच त्यांनी केलाय. तसंच खैरे यांनी भाजपवरही यावेळी जोरदार निशाणा साधलाय.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचीही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून मनसेला ही ऑफर दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्रात छापून आली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ही ऑफर धुडकावल्याचेही वृत्त आहे. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना असं काही नाही, असे सांगून यावर पडदा टाकला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar : “हे श्रीमंतांचे सरकार, त्यामुळे पेट्रोलच्या दरात…”, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- Maharashtra Cabinet Decision | नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान ; शिंदे सरकारचा निर्णय
- Navneet Rana : “मागच्या सरकारला जमल नाही ते…”, शिंदे सरकारच्या मोठ्या घोषणेनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- kangana Ranaut | पहा कंगना रानौतचा ‘इंदिरा गांधी’ लुक; ‘इमर्जन्सी’ चा टीजर रिलीज
- Sachin Sawant : भाजपने केलेल्या ‘त्या’ मागणीचे काय झाले?; शिंदे सरकारच्या घोषणेनंतर कॉंग्रेसचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
