🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हा निर्णय श्रीमंतांसाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.
“हे श्रीमंतांचे सरकार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करून श्रीमंतांना दिलासा मिळाला पण, सर्वसामान्यांना जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही.”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
हे श्रीमंतांचे सरकार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करून श्रीमंतांना दिलासा मिळाला पण, सर्वसामान्यांना जीवनमानाच्या वाढत्या खर्चावर दिलासा नाही.#PetrolDieselPrice
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 14, 2022
किमती कमी झाल्यानंतर मुंबईत इंधनाचे दर काय असतील
राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. विशेष म्हणजे मुंबईत सध्या पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी शिंदे सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर आता शहरात पेट्रोल १०६.३५ रुपयांनी तर डिझेल ९४.२८ रुपयांनी उपलब्ध होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
▪ राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
▪ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
▪ राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
▪ अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
▪ बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
▪ आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Cabinet Decision | नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान ; शिंदे सरकारचा निर्णय
- Navneet Rana : “मागच्या सरकारला जमल नाही ते…”, शिंदे सरकारच्या मोठ्या घोषणेनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- kangana Ranaut | पहा कंगना रानौतचा ‘इंदिरा गांधी’ लुक; ‘इमर्जन्सी’ चा टीजर रिलीज
- Sachin Sawant : भाजपने केलेल्या ‘त्या’ मागणीचे काय झाले?; शिंदे सरकारच्या घोषणेनंतर कॉंग्रेसचा सवाल
- Maharashtra Cabinet Decision | शिंदे सरकारचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय! वाचा एका क्लिकवर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
