🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र यावरूनच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपच्या महाविकास आघाडी सत्तेवर असतानाच्या मागणीची आठवण करून देत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
आज शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे ₹५ आणि ₹३ एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे एकूण वॅटवर ५०% कपात करा म्हणजे एकूण पेट्रोल वरील ₹३२.५५ पैकी ₹१६.२८ व डिझेल वरील ₹२२.३७ पैकी ₹११.१९ कमी करा अशी भाजपाची मागणी होती. त्याचे काय झाले? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी भाजप नेते केशव उपाध्ये यांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
आज शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे ₹५ आणि ₹३ एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे एकूण वॅटवर ५०% कपात करा म्हणजे एकूण पेट्रोल वरील ₹३२.५५ पैकी ₹१६.२८ व डिझेल वरील ₹२२.३७ पैकी ₹११.१९ कमी करा अशी भाजपाची मागणी होती. त्याचे काय झाले? pic.twitter.com/Ajk4ToFone
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 14, 2022
तसेच केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा ₹१० जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे असा आरोप फडणवीस जी करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय? अजूनही गुजरात व कर्नाटक मधील दर फार कमी आहेत. त्याचे काय? जवाब दो! असे दुसरे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Cabinet Decision | शिंदे सरकारचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय! वाचा एका क्लिकवर…
- Eknath Shinde : सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनाही मिळणार ५० हजारांचे अनुदान, पुढील कॅबिनेटमध्ये निर्णय
- chitra wagh : “जे अडीच वर्षात घडत नव्हते ते आता…”, शिंदे सरकारच्या ‘त्या’ घोषणेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- Meera Bhayander : शिवसेनेला मोठा धक्का; मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवक शिंदे गटात जाणार !
- Viral video | नाग व मुंगूसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
