Share

“चंदू खैरे सभेआधी पैसे वाटताना…” ; मनसेचा पुराव्यासह गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवार) सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. खोटे बोलणे हे आमचे हिंदुत्व नाही, असे ते म्हणाले. हिंदुत्व हाच आमचा श्वास असल्याचे ठाकरे म्हणाले. औरंगाबादमधील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपने काही दिवसांपूर्वी काढलेल्या जल आक्रोश मोर्चावरही त्यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजप राज्यात सत्तेबाहेर असल्याने अस्वस्थ आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर विरोधक जोरदार टीका करत आहेत. मनसे आणि भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला. “ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. यावेळी मनसेचे अमेय खोपकर यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “चंदू खैरे सभेआधी पैसे वाटताना… चंदू खैरेंचा ‘आक्रोश’ – सभेसाठी या रे”, असे ट्वीट खोपकर यांनी पुरावा देत केले आहे.

“हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राज ठाकरे! मुख्यमंत्री यांची सभा बघा मागे सर्व खुर्च्या आणि उभा राहायला जागाचं जागा. सभा सुरू असताना लोक घराकडे रवाना, नाद करायचा पण मनसेचा नाही.जय हिंदुराष्ट्र”, असे ट्वीट करतअमेय खोपकर यांनी सभेचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

संभाजीनगरवासियांना पुन्हा एकदा टोमणे मिळाले

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, “बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही. पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही. त्यांनी दुसऱ्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे. म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत. शेतकऱ्यांना मदत केव्हा करणार?, पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?. असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना… काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे !

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!