Share

“आधी नामांतर औरंगाबादचे मग विमानतळाचे”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका

Published On: 

मुंबई: मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन काल  (८ जून) होता. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घेतली. यावेळी त्यांनी औरंगाबाद नामांतर आणि विमानतळ नामांतरबाबत मोठे विधान केले. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

“आता आपले विमान औरंगाबादच्या छत्रपती संभाजी विमानतळावर उतरत आहे, हे ऐकायला कानाला कसे वाटेल? त्यामुळे आधी नामांतर औरंगाबादचे मग विमानतळाचे.”, असे ट्वीट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे?

चिखलठाण येथे होणाऱ्या विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करण्यात आला. कॅबिनेटने देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मात्र  केंद्राने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे भाजपने केंद्रात जाऊन विमानतळाच्या नामकरणाबाबत मंजुरी मिळवून दाखवावी. असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे.

तसेच “मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो. मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. संभाजीनगर नामकरण हे वचन माझ्या वडिलांनी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे. त्याचा विसर पडणे शक्य नाही. नामकरण मी करेन तेंव्हा छत्रपती संभाजीराजे यांना अभिमान वाटेल असे शहर मी घडवुन दाखवेन.” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!