Share

“निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपला होईल”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रात भाजपाच्या कृपेने राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. १० तारखेस राज्यसभेसाठी मतदान व लगेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होईल. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. कारण राजकीय पक्षांच्या आमदारांचे मतदान गुप्त पद्धतीचे नसते. आपण कोणाला मतदान केले हे पक्षाच्या प्रतोदांना दाखवून मतपत्रिका पेटीत टाकायची असते. त्यामुळे राजकीय पक्षांची मते फुटण्याची शक्यता अजिबात नाही. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

खुल्या मतदानाचे नियम लागू झाल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी गेल्या २४ वर्षांत राज्यसभेसाठी निवडणूक झालेली नाही. त्याआधी जेव्हा जेव्हा गुप्त मतदान झाले, तेव्हा ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे प्रकार घडले. एकदा शरद पवार यांच्या पक्षाकडे फक्त सहा मते असताना त्यांच्या पक्षाचे सुरेश कलमाडी हे राज्यसभा निवडणुकीत सहज विजयी झाले होते. अशा गमती जमती आता होणार नाहीत. कारण राज्यसभा निवडणुकीतला घोडेबाजार रोखण्यासाठीच खुली मतदान पद्धती आणली. हे खरे असले तरी हा नियम अपक्षांना लागू होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांना प्रलोभने दाखवून, दाबदबाव टाकून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाने उमेदवार उभा केला. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच भाजपाकडे मतांचे गणित नसतानाही राज्यसभेची निवडणूक त्यांनी लादली. राज्यसभेच्या जागा सहा व उमेदवार सात. त्यामुळे निवडणूक तर होणारच. अर्थात निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपाला होईल, असेच एकंदरीत वातावरण आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!